Type Here to Get Search Results !

जगातील 'या' 5 देशांमध्ये एकही विमानतळ नाही; इतर देशात प्रवास कसा होतो..?

 


Countries Without Airport: वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी दोन गोष्टींचा वापर केला जातो. एक म्हणजे हवाई मार्ग(विमान) आणि दुसरा म्हणजे, सागरी मार्ग(जहाज). विमान प्रवासाला लक्झरी, अतिशय जलद आणि आरामदायक मानले जाते.

यामुळेच बहुतेक लोक इतर देशांमध्ये जाण्यासाठी विमानाची निवड करतात. पण, तुम्हाला माहित आहे का, की जगात असे अनेक देश आहेत जिथे एकही विमानतळ नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पाच देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे विमानतळच नाही. मग या देशात लोक जातात कसे...

1.   अंडोरा(Andorra) स्पेन आणि फ्रान्समध्ये वसलेला हा छोटासा देश युरोपपासून 

पायरेनीस पर्वतरांगांनी (Pyrenees mountains) कापला आहे. हा देश पूर्णपणे 

पर्वतांवर वसलेला असून, या देशाची उंची 3000 फुटांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत या 

देशाकडे स्वतःचे कार्यरत विमानतळ नाही. येथे येण्यासाठी सर्वात जवळचे 

विमानतळ प्रिन्सिपॅलिटी, कॅटालोनियाचे अँडोरा-ला सियु विमानतळ आहे, जे सुमारे 30 

किलोमीटर अंतरावर आहे. तिथे उतरल्यानंतर रस्याने या देशात जाता येते.

2.    लिकटेंस्टाईन(Liechtenstein) लिकटेंस्टीन प्रिंसिपैलिटीदेखील डोंगराळ भागाच्या मध्यभागी वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ 160 चौरस किलोमीटर आहे. लिकटेंस्टीनची संपूर्ण परिमिती 75 किलोमीटर आहे. अवघड ठिकाणी वसल्यामुळे, या देशात विमानतळ नाही. इथे येण्यासाठी 120 किमी अंतरावर असलेल्या झुरिच विमानतळावर उतरावे लागते आणि तिथून बस किंवा कॅबने यावे लागते.

3.      व्हॅटिकन सिटी(The Vatican City) व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान देश 

आहे. या देशाचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. हा देश रोमच्या मध्यभागी 

वसलेला आहे. हा देश ना समुद्राने जोडलेला आहे, ना हवेशी. विमानाने प्रवास 

करण्यासाठी, लोकांना Fiumicino आणि Ciampino विमानतळांवर जावे लागते तिथून 

ट्रेनने या देशात येण्यासाठी 30 मिनिटे लागतात.

4.     मोनॅको प्रिंसिपॅलिटी (Monaco Principality) हा देशही विमानतळाविना आहे. पण

हा देश रेल्वेद्वारे इतर देशांशी जोडलेले आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे 40 हजार 

आहे. इथे विमानतळही नाही. हवाई सेवेसाठी या देशाने शेजारील देश नाइसशी करार

5.     सॅन मारिनो (San Marino) सॅन मारिनो व्हॅटिकन सिटी आणि रोम जवळ आहे. 

हा देश देखील इटलीने वेढलेला आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा देश ना 

समुद्राने जोडलेला आहे ना हवाई मार्गाशी. या देशाचा परिघ 40 किलोमीटरपेक्षा कमी 

आहे, त्यामुळे विमानतळ बांधण्यासाठी इथे जागा नाही. देशापासून सर्वात जवळचे 

विमानतळ रिमिनी, हे 16 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लोकांना व्हेनिस, पिसा

फ्लॉरेन्स आणि बोलोग्ना विमानतळांचा पर्याय आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies