मुंबई - विराट अनुष्काने नुकतेच नवीन घर भाड्याने घेतले आहे. ऐकून आश्चर्य वाटेल परंतु खरं आहे. विराट अनुष्काने भाड्याने घर घेतलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने जुहूमध्ये 1650 स्क्वेअर फूट फ्लॅटसाठी 7.50 लाख रुपये जमा केले आहेत.
मुंबईच्या
एका बाजूला घर असूनही विराटने अनुष्काने चक्क भाड्याने घर घेतल्याने सर्वांच्या
भुवया उन्चावाल्या आहेत. विराट अनुष्का दोघेही स्टार्स आहेत. विदेश वारीसह ते
देशातील अनेक ठिकाणी कामानिमित्त फिरत असतात अशा वेळेस हॉटेलमध्ये राहण्याऐवजी
एखादे स्पेशियस घर असावे म्हणून दोघांनीही विविध शहरांमध्ये घरे घेतलेली आहेत.
विराट आणि अनुष्का कोरोनाच्या काळात अलिबागमध्ये राहत होते. दोघांनाही ते ठिकाण
इतकं आवडलं की त्यांनी ते घर घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी संबंधित व्यक्तीशी
बोलून घराची सजावट ठरवली. या फोर बीएचके घराची किंमत तब्बल 10.05 कोटी रुपये आहे. हे घर १४ ते १८
महिन्यांत राहण्यासाठी रेडी होणार आहे.
त्यासोबतच
दोघांचाही दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एक बंगला आहे, ज्याची किंमत 80 कोटी रुपये
आहे. याशिवाय विराट-अनुष्काचा मुंबईत एक अपार्टमेंट आहे ज्याची किंमत जवळपास 34 कोटी रुपये आहे. या दोघांची मुंबईतील वर्सोवा येथेही मालमत्ता
आहे. हा 3 BHK
फ्लॅट आहे ज्याची किंमत 10 कोटी रुपये आहे.
केवळ फ्लॅट
किंवा अपार्टमेंटच नाही तर विराट कोहलीचे अनेक शहरांमध्ये रेस्टॉरंट्सही आहेत.
त्याचबरोबर अनुष्का शर्मानेही जवळपास 36 कोटी
रुपयांची वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्याच्याकडे देशभरातील अनेक
शहरांमध्ये अनेक स्थावर मालमत्ता आहेत.