प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रियकराच्या पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 21 वर्षीय प्रेयसीला गजाआड केले आहे.
याप्रकरणी
अधिक माहिती अशी की, मयत कोमल
हिचा पती गणेश केदारी आणि स्वाती रेगडे या दोघांचे अनैतिक संबंध होते. या
दोघांमध्ये कोमल वरून अनेकदा भांडण होत होती. याचा राग स्वाती रेगडे या महिलेच्या
मनात होता. 16
नोव्हेंबर रोजी गणेश केदारी
कंपनीत कामाला गेला असता आरोपी स्वाती हिने घरात एकट्या असलेल्या कोमलचा गळा आवळून
खून केला होता.
दरम्यान
सुरुवातीला खेड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल होता.
संशोधन अहवालात गळा आवळून कोमलचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी
संशयित महिला स्वाती रेंगडे हिला जुन्नर मधून ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेला
अधिक चौकशीत तिने खून केल्याची कबूल दिले.