सुट्टी न घेता नुकसानीचे पंचनामे करा : काळदरी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

 सुट्टी न घेता नुकसानीचे पंचनामे करा : काळदरी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 



पुरंदर दि.६


 पुरंदर तालुक्यातील  पुरंदर किल्ल्या लगत असलेल्या आणि  ढगफुटी गेलेल्या  बांदलवाडी, काळदरी परिसरात आज  शनिवारी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.यानंतर त्यांनी सबंधित नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


    काळदरी  खोऱ्यात गुरवारी रात्री जोरदार पाऊस झाला होता अडीच तास पडलेल्या पावसाने या भागातील शेती आणि रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे.तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आज या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली यानंतर त्यांनी आज आणि उद्या सुट्टी न घेता पंचनामे केले जावेत, अस त्यांनी म्हटलंय. तर लोकांनी या वेळी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलय.आज तहसीलदार यांच्या सोबत मंडलाधिकारी,कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी अधिकारी उपस्थित होते.यानंतर याभागात तातडीने पंचनामे करण्यास सुुरवात करण्यात आली आहे.या भागात शेती आणि रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..