कामे आम्ही मंजूर करू पण ती चांगल्या दर्जाची करून घ्यायची जब्बादरी नागरिकांनी सुध्दा घ्यावी .: आमदार संजय जगताप
पिंगोरी येथील विविध विकास कामांचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
वाल्हे दि.४
आम्ही राजकीय मंडळी सरकारमध्ये बसून आपल्या मतदार संघात जास्तीत जास्त विकास कामे कशी होतील ते पाहत असतो.त्यासाठी निधी आणत असतो.मात्र ती कामे चांगल्या दर्जाची होतायत की नाही? हे ग्रामस्थांनी पाहायला हवे.गावात होत असलेल्या विकास कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे आवाहन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
पिंगोरी ता.पुरंदर येथे खा.सुप्रिया सुळे व आ.संजय जगताप यांच्या मध्यातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ दि.3 मे रोजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जगताप बोलत होते यावेळी पिंगोरी ग्रामपंचायतीचे सरपंच जीवन शिंदे, सदस्य, ज्योती शिंदे,काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष प्रदीप पोमन ,गणेश जगताप,अड.विजय भालेराव, राजेंद्र बरकडे आबा मोकाशी,तुषार माहुरकर, विकास इंदलकर,मयूर मुळीक,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस निलेश शिंदे, काँग्रेसचे नीरा कोळविहिरे युवक अध्यक्ष दत्ताराजे शिंदे, सचिन शिंदे इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सरपंच जीवन शिंदे यांनी आमदार संजय जगताप यांनी कोट्यावधींची विकास कामे पिंगोरीत दिल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.यावेळी बोलताना आमदार म्हणाले की,गेल्या दोन वर्षात आपण पिंगोरी गावात १० कोटी पेक्षा जास्त रकमेची विकास कामे केली आहेत. आजही आपण तीन कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमी पूजन करीत आहोत.खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यालुक्यातील विकास कामांसाठी मोठा निधी मिळवत आहोत.आता लोकांनी ही होणारी विकास कामे चांगल्या दर्जाची कसी होतील याकडे लक्ष द्यावे.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक निलेश शिंदे यांनी केले तर आभार दत्ताराजे शिंदे यांनी मानले