Saturday, May 14, 2022

पिंगोरी येथे सर्पदंशामुळे कालवडीचा मृत्यू

 पिंगोरी येथे  सर्पदंशामुळे कालवडीचा मृत्यू



नीरा दि.१४


   पिंगोरी ता.पुरंदर येथील एका शेतकऱ्याच्या खीलार कालावडीचा  आज (दि.१४) रोजी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यामुळे शेतकऱ्याचे सुमारे २० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती पिंगोरीचे सरपंच जीवन शिंदे यांनी दिली आहे.

         आज दुपारी शेतकरी अनिल भोसले यांनी त्यांची जनावरे  गोठ्या समोरील झाडाखाली बांधली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक साप कालवड  खात असलेल्या चाऱ्या मध्ये आला.त्याच वेळी  कालवडीने तोंडाने  सापाला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी साप कालवडीच्या तोंडाला चावला आणि पुढील दहा मिनिटातच या  कालवडीचा तडफडून मृत्यू झाला.यानंतर याबाबतची माहिती भोसले यांनी पिंगोरी गावाचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांना दिली.यानंतर पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली .यानंतर याबाबत पोस्टमार्टम करण्यात आले.याबाबत बोलताना सरपंच जीवन शिंदे म्हणाले की, पिंगोरी परिसरात वन्यजीवांचे वास्तव्य वाढले आहे.त्यामूळे शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी.जनावरांच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.

No comments:

Post a Comment

Featured Post

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे  नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा  नीरा :   ...