पिंगोरी येथे ग्रामस्वच्छतेसाठी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांनी घेतला हातामध्ये झाडू आणि फावडे
नीरा दि.१४
गेली दीड वर्ष प्रशासकीय राजवटीत असलेल्या व निवडणूकी नंतर प्रशासकीय राजवटीतून बाहेर पडलेल्या पिंगोरी ग्रामपंचायतीचा कारभार तरुणांच्या हातात आला आहे.आणि म्हणूनच विकास कामाचा ध्यास घेऊन ही तरुणाई काम करताना दिसते आहे. गेली दोन दिवस पिंगोरीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकाराने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी स्वतः स्वच्छता अभियानात भाग घेऊन ग्राम स्वच्छता केली.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते.या गावाच्या देवीची यात्र दिनांक १५ व १६ एप्रिल दरम्यान होत आहे.त्याच पार्श्वूमीवर पिंगोरी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ्ता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त गावातील लोकांनी श्रमदान करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले होते.याला प्रतिसाद देत गावातील अनेक लोकांनी सहभाग घेत ग्राम स्वच्छ्ता केली. यावेळी सरपंच जीवन शिंदे,उपसरपंच प्रकाश शिंदे ,पोलीस पाटील राहुल शिंदे,सदस्य संदीप यादव,भाग्यश्री शिंदे, सुषामा भोसले. राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस निलेश शिंदे,सचिन शिंदे,अनिल भोसले,प्रवीण शिंदे,अमोल शिंदे,मिलिंद यादव,राकेश जंगम,कांतराम शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.