Type Here to Get Search Results !

सासवड जेजुरी रोडवर दोन दुचाकींचा अपघात एकजण गंभीर जखमी

 सासवड जेजुरी रोडवर दोन दुचाकींचा अपघात एकजण गंभीर जखमी 
जेजुरी दि.१


     पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे दोन दुचाकींचा अपघात झाला असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर जेजुरी येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 


   याबाबत प्रत्यक्षद्रशी लोकांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक १ मे रोजी सकाळी साडे आकरा वाजलेच्या सुमारास पुणे पंढरपूर मार्गावर जेजुरी सासवड दरम्यान शिवरी नजिक असलेल्या तक्रारवाडी येथे हा अपघात झाला आहे. यामध्ये पिंगोरी येथील विकास गणपत शिंदे वय ४२ व त्याच्या सोबत आणखी एक जण बुलेट क्रमांक mh 46 bt 3247 वरून पुण्याहून पिंगोरीकडे निघाले होते. तर विनायक तांबे वय 26 व अक्षय ढोकरे वय 27 राहणार मुर्टी ता.पुरंदर,जी.पुणे हे मोटार vसायकल क्रमांक mh 12 g's 5344 वरुन मुंबईहून मुर्टीला निघाले होते.तक्रारवाडी येथे मोटारसायकल स्वार एका टेम्पोला ओव्हरट्रेक करीत असताना या दोन मोटार सायकलची टक्कर झाली. यामध्ये विकास शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.तर विनायक तांबे याचा हात मोडला आहे.त्याच बरोबर अक्षय ढोकरे याच्या डोक्याला मार लागला असून ते दोघेही शुद्धीवर आहेत. त्यांच्यावर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies