सध्या शिक्षण संस्था चालवणे सोपे राहिले नाही; सतिश काकडे

 सध्या शिक्षण संस्था चालवणे सोपे राहिले नाही;

सतिश काकडे



   नीरा दि.१


     शिक्षण ही अत्यावश्यक गोष्ट आहे. गावागावांतील  मुलांना शिक्षण मिळायला हवे.मात्र सध्या शिक्षण संस्था चालवणे म्हणजे सोपे राहिले नाही.या शिक्षण संस्था चालवताना संस्थाचालकांच्या नाकी नवू येत आहे.असे प्रतिपादन शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश काकडे यांनी नीरा येथे बोलताना केले.



   नीरा (ता.पुरंदर) येथे काल (दि.३०) एप्रिल रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालयात असेंड इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी काकडे बोलत होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ खोमणे, सचिव नीता खोमणे,संस्थेचे उपाध्यक्ष सुदर्शन शहा,संचालक डयाभाई पटेल,राष्ट्रवादीचे बापूसाहेब भोर व पालक उपस्थित होते.



  यावेळी सतिश काकडे यांची ज्यूबिलंट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल,राहुल शिंदे यांची पुरंदर पोलीस पाटील संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल.तर भरत निगडे यांना छत्रपती संभाजी राजे पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

   यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, अडेंड इंग्लिश मिडीयम स्कूलने कमी कालावधीत चांगली प्रगती केली आहे.याभागात सीबीएससी अभ्यासक्रम असलेली या भागातील ही एकमेव शाळा आहे. विना अनुदानित असली तरी या स्कूलने मुलांना सैनिकी शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.अशा प्रकारे शिक्षण संस्था चालवणे अवघड असले तरी त्यांनी ते करून दाखवले आहे. यावेळी राहुल शिंदे, भरत निगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

     यानंतर  शालेय मुलांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम केला.पालकांनी या कार्यक्रमाला उस्पूर्द प्रतिसाद दिला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुलाल  पडवळ  व तनुजा शहा यांनी केले तर आभार नीता खोमणे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..