तीन मे रोजी होणार पुरंदर
तालुक्यात आमसभा: आमदार संजय जगताप यांची माहिती
सासवड दि.९
पुरंदर तालुक्यातील आमसभा ३
मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे मतदार संघाचे आमदार संजय जगताप यानी दिली आहे.त्याच बरोबर
तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी या आमसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन ही त्यांनी
केले आहे.
तालुक्यातील लोकांचे
प्रश्न आणि समस्या समजून घेण्यासाठी वर्षातून एकदा आमसभा घेतली
जाते. मात्र कोरोनामुळे गेली दोन वर्ष पुरंदर तालुक्यात आमससभा घेण्यात आली
नव्हती, मात्र आज दिनांक ९ एप्रिल रोजी पुरंदर
हवेलीचे मतदार संघाचे आमदार संजय जगताप यांनी येत्या तीन मे रोजी सासवड येथे आमसभा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केलंय. त्याच
बरोबर या आमसभेला तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे. असा आवाहन ही
त्यांनी केले आहे. आज झालेल्या टंचाई
आराखडा बैठकीच्या वेळी जगताप यांनी ही घोषणा केली आहे.