झुकेगा नही साला' भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच उद्धव ठाकरे यांना आव्हान
मुंबई दि.२० भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची चौकशी झाल्यानंतर ते आणखीनच चवताळून उठले आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आमच्या कुटुंबातील कुणावराही तक्रार केली तरी आम्ही झुकणार नाही.हे माफिया सरकार आणखी काय करू शकते असा सवाल इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाआहे त्यांचे पुत्र निल सोमय्या यांना आज आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी तुर्तास कोणतीही कठोर कारवाई नकरण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मात्र अटक झाल्यास ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या यांची देखील आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी तीन तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असे म्हटले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी य आरोप करताना किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या या दोघांनाही जेलमध्ये पाठवा अशी भाषा वापरली होती. याची आठवण किरीट सोमय्या यांनी करून दिली. आज पत्रकारां बरोबर बोलतांना ते म्हणाले की,संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणजे माफीया सरकार आहे त्यामुळे ते अशी भाषा वापरू शकते. न्यायालयाने खरी बाजू उचलून धरली व माझ्या सह निल यांनाही कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात खोटा एफआयआर दाखल केलं करण्यात आल्याचं कोर्टाने म्हटले आहे. असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.