आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन साठी अर्ज ?
नाईक चार दिवसांपासून बेपत्ता
मुंबई ; भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होताना दिसते आहे.एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आले. मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यानंतर या महिलेनं राज्य महिला आयगाकडे तक्रार केली आहे.
राज्य महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन त्यांनी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना याबाबत दोन दिवसात त्यांना अहवाल पाठवण्याची सूचना दिली होती. त्यानंतर आता चार दिवस गेले सोडून गेले तरी देखील गणेश नाईक यांना अटक झाली नाही. तर पोलिसांकडून गणेश नाईक यांचा शोध सुरू आहे. त्यांचं घर कार्यालय आणि मुरबाडमधील फार्म हाउस या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र त्या ठिकाणी ते आढळून आले नाहीत. तर गणेश नाईक यांच्यावर रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या महिलेने १९९३पासून गणेश गणेश नाईक आपले लैंगिक शोषण व मानसिक छळ करत होते अशा प्रकारचा आरोप केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटल्यानंतरही अद्याप नाईक यांना अटक झाली नाही. त्यानंतर गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.