पत्रकार भरत निगडे यांना छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 पत्रकार भरत निगडे यांना  छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान



 नीरा दि.१२


   पुरंदर तालुक्यातील नीरा येथील दैनिक लोकमतचे  नीरा प्रतिनिधी  भरत निगडे यांना सासवड येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात  'छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ठ पत्रकार' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


     आज दि.१२ रोजी सासवड येथे जयदीप मंगल कर्यालयात   झालेल्या जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परषद आयोजित राज्यस्तरीय  १३ वे छत्रपती साहित्य सम्मेलन आज पारपडले.यामध्ये भरत निगडे यांना 'छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ठ पत्रकार' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गुलाब  वाघमोडे व विजय कोलते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.        

      

         यावेळीज्येष्ठ साहित्यिक भा.ल.ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे,पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते,सोनाली यादव पुणे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे उत्तम कामठेर, गौरव कोलते, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्रीकांत ताम्हणे, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष संजयआण्णा जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, पुरंदर तालुका सेवादल अध्यक्ष रामभाऊ काळे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचे सह अनेक साहितिक, लेखक, कवी,व नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..