Wednesday, March 16, 2022

सासवड येथे बसमध्ये चढणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले पळवले

 सासवड येथे बसमध्ये चढणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले पळवले



 सासवड दि.१७


पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पीएमटी बस स्थानका मध्ये बस मध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले चोरीचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


   यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पीएमटी बसस्थानकामध्ये ७५ वर्षीय फिर्यादी महिला ताराबाई एकनाथ पोमण या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून नेले . एक तोळा वजनाचे अंदाजे किंमत ४८ हजार रुपये किंमत असलेले डोरले चोरून नेले आहे. यासंदर्भात त्यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली असून याबाबतचा अधिक तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कांतोडे करीत आहेत दि.१६/०३/२०२२ रोजी दुपारी २:०० वा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

No comments:

Post a Comment

Featured Post

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद

  वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद, १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्या...