मावडी येथे गावात सारखा का येतो? असे विचारल्यावरून एकाला हातोड्याने मारहाण ; जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल.

 मावडी येथे गावात सारखा का येतो? असे विचारल्यावरून एकाला हातोड्याने मारहाण ; जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल.



  जेजुरी दि.१३



   पुरंदर तालुक्यातील  मावडी येथे एकाला  सारखा सारखा आमच्या गावात का येतोस? असे विचारल्यावरून  विचारनाऱ्या व्यक्तीला  हातोडयाने मारहाण करण्यात आली आहे.यामध्ये एक जण जखमी झाला आहे.याबाबत जेजुरी पोलिसांनी  भारतीय दंड विधान कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुरंदर तालुक्यातील  मावडी येथे दिनांक  12/02/2022 रोजी 12.30 वा.दरम्यान मौजे मौजे मावडी येथील  जगताप गॅरेज जवळ ही घटना घडली आहे.याबाबत  वीस वर्षीय शुभम जयवंत सोनवणे याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारी नुसार  जवळार्जुन येथे राहणारा आरोपी शेखर दिलीप नलवडे हा सतत  मावडी येथे येत असल्याने फिर्यादी यांनी तू आमच्या गावात सारखा सारखा का येतोस? असे विचारले.यावरून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून दुखापत केली असल्याची तक्रार दिली आहे.या घटनेचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस नाईक खाडे करीत आहेत.


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..