जेजुरी येथे गैरसमजतून पेटीएम एक्झिक्यूटिव्हला मारहाण
जेजुरी दि.१४
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एका पेटीएम एक्झिक्यूटिव्हला गैर समाजातून मारहाण करण्यात आली असून याबाबत जेजुरी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी
भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेटीएम एक्झिक्यूटिव्हचे काम करणारे फिर्यादी महेंद्र चिंतामणी चिल्लाळ व त्यांचा मित्र मयूर अशोक तांगडे हे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी साडे चार वाजता आरोपी विराज पांडुरंग कदम याचे जेजुरी गावचे हद्दीत कोथळे चौक येथील मंगेश वॉच कंपनी या दुकानांमध्ये गेले होते.तिथे त्यांना पेटी एमचा साऊंड बॉक्स आरोपीला दिला होता. त्याचे सेटिंग करत असताना आलेल्या मेसेज वरून गैरसमज झाल्याने, त्या कारणावरून आरोपी दयानंद अशोक कुदळे याने फिर्यादीचे पाठीमागून डोक्यात हातातील लोखंडी कडे मारून दुखापत केली व आरोपी तावडे व त्याचा मित्र मयूर अशोक तांगडे यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली .
अशा प्रकारची फिर्याद जेजुरी पोलिसात देण्यात आली असून याबाबत जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक खांडे तपास करीत आहेत.