सासवड आणि जेजुरी नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती
सासवड दि.१३
पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी या नगर परिषदांचा कारभार आता प्रशासकाच्या ताब्यात गेला आहे.या नगर परिषदेच्या लोक निर्वाचित कारभाऱ्यांची मुदत संपल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांची मुदत संपली आहे.कोरोनामुळे या नगरपरिषदांची निवडनुक प्रशासनाला घेता आली नाही .ओबीसी आरक्षण हा सुद्धा मुद्दा या निवणुका लंबाण्याच कारण आहे. आणि म्हणूनच आता मुदत संपलेल्या या नगरपरिषदांचे कारभार आता प्रशासकाच्या हातात सोपवण्यात आले आहेत.पुरंदर तालुक्यातलं सासवड आणि जेजुरी या दोन नगर परिषदा आहेत . यांचा कारभार पाहण्यासाठी पुरंदर दौंडचे प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या बाबतचा आदेश दिला आहे .त्यामूळे आता नगरपरिषदांच्या कारभार आता प्रशासकाच्या ताब्यात जाणार आहे.