पांडेश्वरच्या उपसरपंचपदी
दक्षता शेंडगे यांची निवड
दि.2
पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर ग्रामपंचायतीच्या
उपसरपंच पदी कॉंग्रेसच्या दक्षता हीम्मत शेंडगे यांची बिन विरोध निवड करण्यात आली
आहे . आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी ही
निवड करण्यात आली.
९ सदस्य संख्या असलेल्या पांडेश्वर ग्रामपंचायती
मध्ये राष्ट्रवादीचे ५ तर कॉंग्रेसचे चार सदस आहेत. आठ महिन्या पूर्वी या ग्राम
पंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच संगीता शेंडगे
यांनी राजीनामा दिला होता.त्यामुळे हे पद गेली आठ महिने रिक्त होते.
आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी सरपंच शैला
हनुमत शिंदे यांच्या अध्यक्षते खाली मासिक सभा संपन्न झाली. या मध्ये दक्षता हीमत शेंडगे यांची सर्वानु मते उपसरपंच म्हणून निवड करण्यात
आली. निवडी नंतर ग्रामस्थांच्यावतीने शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
सर्व सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निवडीचे कामकाज
ग्रामसेवक जयश्री भागवत यांनी पहिले. निवडी नंतर बोलताना उपसरपंच दक्षता शेंडगे म्हणाल्या
की, गावाने जो माझ्यावर विस्वास दाखवला आहे, त्याच विश्वासाने गावाच्या सर्वांगीण
विकासासाठी मी माझ्या इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करेन.