Saturday, October 25, 2025

डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी राहुल शिंदे यांची निवड जाहीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले अभिनंदन

डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी राहुल शिंदे यांची निवड जाहीर


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले अभिनंदन 



मुंबई :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी पुणे जिल्ह्यातील राहुल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. 


    अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस. एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात डिजिटल मिडिया परिषदेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लवकरच राज्य, विभागीय आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी निवडी संदर्भांत एक व्यापक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती सुद्धा प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी राहुल शिंदे यांची नुकतीच निवड जाहीर केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या व डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व राज्य स्तरीय अधिवेशने, विभागीय मेळावे, महत्वपूर्ण बैठकांना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याच्या सुचना श्री.राहुल शिंदे यांना देण्यात आल्या. 


      राहुल शिंदे हे या पूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. काही काळ शिंदे हे पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष होते. त्यांनी याकाळात परिषदेच्या धेय्य धोरणांनूसार भरीव असे संघटनात्मक काम केले आहे. कोव्हिड काळात ते पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना पत्रकारांना भरीव मदत केली होती. 


     राहुल शिंदे यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी.लांडगे, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष भरत निगडे, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, सचिव अमोल बनकर, जेष्ठ पत्रकार दत्तानाना भोंगळे, बी.एम. काळे, प्रकाश फाळके यांसह पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांसह सह सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday, October 13, 2025

निरेच्या शिरपेचात मानाचा तुरा.. या कलाकाराला पुन्हा राज्य शासनाचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित

 निरेच्या शिरपेचात मानाचा तुरा.. 


अमर झेंडे यांना पुन्हा राज्य शासनाचा पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित 



पुरंदर : निरा येथिल अमर झेंडे यांना या वर्षीचा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या चित्रपट पुरस्कारांमध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी (दि.१२) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते 'ऐतिहासिक लूक' डिझाईन  'प्रोस्थिटिक मेकअप आर्टिस्ट' म्हणून अमर लालासो झेंडे यांचा विशेष  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले 


      महाराष्ट्र  राज्य चित्रपट पुरस्कारांचा हीरक  महोत्सवी ६० आणि ६१ वा सोहळा मुंबईच्या वरळी येथील  एन.एस.सी.आय. च्या डोम मध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. यावर्षी विविध श्रेंणीमध्ये महत्त्वपूर्ण  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार. यांच्या हस्ते पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ऐतिहासिक लूक डिझाईन प्रोस्थिटिक मेकअप आर्टिस्ट म्हणून निरा (ता.पुरंदर) येथील अमर लालासो झेंडे यांना विशेष पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या शिवप्रताप गरूडझेप, छावा, केसरी २ या चित्रपटात अमर झेंडे यांनी विविध पात्रांना ऐतिहासिक लुक डिझाईन केले होते. 



     निरेतील प्रसिद्ध सलुनचा व्यावसायिक, समर्थ फेटेवाले ते टिव्ही मालिका व चित्रपटातील दिग्गज कलाकारांचे मेकअप आर्टिस्ट असा प्रवास करणारे अमर झेंडे यांचा मुंबईत सन्मान करण्यात आल्याने निरेकर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. झेंडे यांना यापूर्वी ही राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच झि युवा पुरस्काराने ही नुसतेच सन्मानित करण्यात आले होते. निरेच्या सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य संदिप धायगुडे, प्रसिद्धी कॉन्ट्रॅक्टर राहुल थोपटे, राजेंद्र थोपटे, विलास थोपटे, अभय थोपटे यांनी झेंडे यांनी केले. निरा शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा म्हणून झेंडे यांच्याकडे पाहिले जात आहे. 

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...