उद्या रविवारी रेल्वेने प्रवास टाळा... सातारा पुणे दरम्यान दिवसभर रेल्वे वाहतूक बंद.

 उद्या रविवारी रेल्वेने प्रवास टाळा...

सातारा पुणे दरम्यान दिवसभर रेल्वे वाहतूक बंद.


नीरा : मुंबई कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस रविवारी रद्द व पुणे कोल्हापूर दरम्यान धावणारी पॅसेंजर रविवारी पुणे सातारा दरम्यान रद्द झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

    कोल्हापूर पुणे लोह मार्गावरील मिरज पुणे दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व काही ठिकाणी नव्याने अंडरपासची कामे सुरू आहेत. रविवारी नीरा लोणंद दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक नव्या रेल्वे रुळांना  जुन्या रुळांशी जोडण्याची काम व इतर कामे होणार आहेत. यामुळे काही दिवसभरासाठी संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागत असते. रविवार दि. २० ऑगस्ट रोजी गाडी नंबर ११०३० कोल्हापूर हुन मुंबईकडे जाणारी व ११०२९ मुंबई हुन कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस धावणार नाही तसेच ११४२५ पुणे ते कोल्हापूर व ११४२६ कोल्हापूर ते पुणे पॅसेंजर गाडी पुणे ते सातारा दरम्यान बंद राहणार आहे. कोयना एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीच्या दोन्ही दिशांच्या फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा असे आव्हान रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..