Sunday, January 1, 2023

Shahrukh Khan वादात अडकवतोय 'चोरीचा मामला'; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?

 


Pathaan Movie Song Besharam Rang Steal From Sajjad Ali : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा 'पठाण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला शाहरुख हा चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका पदुकोणनं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनांचे लोक यावर आक्षेप घेत गाण्यातील काही सीन हटवण्याची मागणी करत आहेत. या वादानंतर पठाण मधील 'बेशरम रंग' गाण्याबाबत सेंसर बोर्डनं चित्रपटातील गाण्यात काही बदल करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानी गायक सज्जाद अलीनं या गाण्यावरून बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

सज्जाद अली यांनी 'बेशरम रंग' गाण्याविषयी मोठा खुलासा केला आहे. 'बेशरम रंग' हे गाणं त्याच्या 'अब के हम बिछडे' या बरीच वर्षे जुन्या असलेल्या गाण्यासारखे आहे. त्यांनी 'पठाण' चित्रपटाचे किंवा त्याच्या निर्मात्यांचे किंवा मग गाण्याचे नाव न घेता चोरीचा आरोप केला आहे. सज्जाद अली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते एका आगामी चित्रपटातील गाणं ऐकत असल्याचे सांगत आहेत. हे ऐकताना त्यांना 25-26 वर्षांपूर्वीच एक गाणं त्यांना आठवल्याचे सांगितले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...