Type Here to Get Search Results !

माझ्यासोबत बोल, अन्यथा लफडं असल्याची बदनामी करेन! फायनान्स वसुलीभाईने मांडला उच्छाद, कॉलेज, घरापर्यंत पाठलाग

 


मरावती: माझ्यासोबत बोल, अन्यथा लफडं असल्याची बदनामी करेन! अशी गर्भित धमकी देत एका अल्पवयीन मुलीचा कॉलेज ते घरापर्यंत पाठलाग करण्यात आला. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी दुपारी प्रणय हिरालाल वानखडे (२४, भुगाव) याच्याविरूध्द विनयभंग, धमकी व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पिडित मुलगी ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे. तर आरोपी प्रणय वानखडे हा अचलपूर येथे फायनान्स कंपनीमध्ये वसुलीचे काम करतो. काही दिवसांपासून आरोपीने तिचा पाठलाग चालविला. तो पाठलाग करत तिच्या गावी तिच्या वडिलांच्या दुकानातदेखील पोहोचला. तो एवढयावरच थांबला नाही. तर त्याने तिचे आयटीआय कॉलेज देखील गाठले. तेथे तिला थांबवुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्याने तिला एकट्यात गाठण्याचा प्रयत्न केल्याने ती नखशिखांत हादरली. तिने ही बाब वडिलांच्या कानावर टाकली.

भाऊ, आईवडिलांना मारण्याची धमकी

मुलीने प्रणयच्या त्रासाबद्दल सांगताच तिच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आपली मुलगी तुझ्यासोबत बोलायला तयार नाही, तू तिचा पाठलाग करु नकोस, असे त्यांनी बजावले. त्यानंतर सुध्दा आरोपी त्या मुलीच्या घराच्या आजुबाजुला फिरत असतो. २९ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी मुलीच्या गावात पोहोचला. तिला, माझ्यासोबत बोल नाहीतर तुझे माझ्यासोबत लफडे आहे, अशी बदनामी करेन, तसेच तुझा भाउ व आई वडिल यांना जीवाने मारुन टाकील अशी धमकी दिली. त्यामुळे तिच्या वडिलांनी शनिवारी सायंकाळी पथ्रोट पोलीस ठाणे गाठले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies