Type Here to Get Search Results !

बारामती येथे संविधान दिन साजरा

 बारामती येथे संविधान दिन साजराबारामती:(विशेष प्रतिनिधी प्रा.गोरख साठे यांजकडून )

७३ वा संविधान दिन बारामती येथे ज्येष्ठ नागरिक संघ येथे साजरा करण्यात आला. यावेळी बारामती पोलिस स्टेशनचे पोलिस सब् इन्स्पेक्टर महाडिक साहेब यांना संविधानाची प्रास्ताविका १८  मान्यता प्राप्त  संस्थांचे वतीने प्रदान करण्यात आली.यावेळी बोलताना संविधानात्मक जीवन मुल्ये प्रत्येक नागरिकांनी  काळजी पुर्वक जपण्यासाठी शिस्तीची आवश्यक पावलं टाकत  जीवन जगण्याची कला  विकसित केली पाहिजे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान देऊन  सामाजिक समतेचा बंधुभावाचा महान संदेश दिला असल्यामुळे संविधान आपला आत्मसन्मान वाटचालीस महान प्रेरणा देते .असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक समतेवर ज्येष्ठ नागरिक संघ बारामती अध्यक्ष  माधव जोशी यांनी सार्वभौम लोकशाहीची संविधानात्मक तत्वा  विषयी डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशात शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हया आदर्शाची शिकवण दिली. देश एकसंघ राहिला तर जीवन मुल्ये शोधताना त्रास होऊ नये म्हणून सतत संघर्ष करावा लागतो आणि तो प्रत्येकाला करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजियनिअर  सुरजसिंग ;नवी दिल्ली यांनी भूषविले.  सामाजिक व राजकीय नेतृत्व विकसित करायचे असेल तर संविधान चळवळ वाढवली पाहिजे तर लोकशाहीची व्याख्या समजली जाते असे मत प्रतिपादन केले. 

संविधान दिन साजरा करताना धर्मनिरपेक्ष लोकशाहीची बळावर आपण सर्वांचा उद्धार केला नाही तर राष्ट्राची मान चिन्हे  बळकट करण्याचे आवाहन केले  .

यावेळी प्रा. गोरख साठे यांनी  संविधान प्रास्ताविका शपथ वाचन  केले. यावेळी सामाजिक व राजकीय  क्षेत्रातील मान्यवरांच्याउपस्थितीत  ३० राष्ट्रीय  पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी निरा येथील सुनिल आण्णा पाटोळे यांना   भारतरत्नडॉ बी.आर.आंबेडकर नॅशनल एक्सलन्स  पुरस्कार २०२२  बारामती पोलिस सब इन्स्पेक्टर सुनिल महाडिक यांचे

हस्ते देण्यात आला.  प्रा.गोरख  साठे यांनी यावेळी संविधान प्रास्ताविका शपथ वाचन केले .

७३ व्या संविधान दिनाचेअध्यक्ष  म्हणून सुरजसिंग  दिल्ली यांनी भूषविले. 

सुत्रसंचालन पत्रकार भैरवनाथ कानडे यांनी केले. 

संविधान दिन महोत्सवनिमित्त २० राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले. महोत्सवात सामाजिक समतेवर आधारीत मान्यवर व्याख्याने संपन्न झाली. 

संयोजन प्रा.गोरख साठे बारामती यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies