Type Here to Get Search Results !

अनोखा विवाहसोहळा! ...म्हणून तरुणीने देवासोबत बांधली लग्नगाठ; वडील चिडले पण आईचा पुढाकार


 कुंडलीत दोष नाही... ना कसला नवस, ना कुठली परंपरा. तरीही जयपूरच्या एका उच्चशिक्षित तरुणीने देवासोबत लग्नगाठ बांधली आहे. पूजा सिंह असं या तरुणीचं नाव असून तिने भगवान श्रीकृष्णाशी लग्न केलं आहे.

त्यांच्याच नावाने हातावर सुंदर मेहंदी काढली. सिंदूर भरून लग्न केलं आहे. सध्या या अनोख्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

अनोख्या लग्नाच्या निर्णयामागचं कारण म्हणजे पूजा सिंहला आयुष्यभर अविवाहित राहायचं नव्हतं. 

तसेच तिची विचारसरणी थोडी वेगळी आहे. म्हणून तिने राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील 

गोविंदगडजवळील नरसिंहपुरा गावातील मंदिरात भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला. या लग्नात मेहंदी, हार 

ते कन्यादान आणि निरोपापर्यंतचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात पार पडले.

पूजा सिंह नववधूप्रमाणे सुंदर नटली होती. लग्नाला वडील आले नाहीत तर मंडपात त्यांच्या जागी 

तलवार ठेवली होती. पूजा सिंहने सांगितले की, देवासोबत लग्न करण्याचा निर्णय तिने स्वतः घेतला 

होता. कोणीही दबाव आणला नाही. सुरुवातीला तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज तिच्या निर्णयाशी 

सहमत नव्हते.

वडील चिडले. लग्नालाही आले नाहीत पण आई रतन कंवर यांनी मुलीच्या निर्णयाचा मान राखत 

स्वत:च्या उपस्थितीत थाटामाटात मुलीचे लग्न लावून दिले. पूजाने एमए केलं आहे. वडील प्रेम सिंह 

मध्य प्रदेशात सुरक्षा एजन्सी चालवतात. पूजाचे तीन लहान भाऊ अंशुमन, शिवराज आणि युवराज सिंग 

हे शाळा-कॉलेजमध्ये शिकत आहेत

लग्नात वडील न आल्याने पूजा सिंह खूप दुःखी आहे. आई-वडिलांचे सर्व विधी तिच्या आईने पार 

पाडले. 

पूजा सांगते की, तिने लहानपणापासून पाहिलं आहे की पती-पत्नी छोट्या-छोट्या गोष्टींवरही भांडतात, त्यामुळे नातं तुटतं. अनेक प्रकरणांमध्ये महिलांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते.

. हे सर्व पाहून आणि समजून घेऊन पूजाने आयुष्यभर कोणत्याही मुलाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर घरच्यांनी अनेक मुलं पाहिली, पण पूजाने प्रत्येक वेळी नकार दिला. पूजा सिंहच्या लग्नाला आईशिवाय नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

ननिहालमध्ये एकदा तुळशीच्या रोपाचं भगवान श्रीकृष्णाशी लग्न झाल्याचं पाहिले. मग विचार केला की 

जेव्हा तुळशीचं लग्न देवाशी होऊ शकते तर माझं का नाही? याबाबत पंडितजींना विचारलं असता ते 

शक्य असल्याचे सांगितलं. तुम्हीही आईने हा निर्णय मान्य केला पण वडील तयार नव्हते.

लग्नासाठी तीन लाख रुपये खर्च झाले आहेत. मंदिराची सजावट करण्यात आली होती. सुमारे 300 

लोकांसाठी जेवण तयार करण्यात आले होते. लग्नाचे सर्व सामान्य विधी पार पडले. मंडपही सजवण्यात 

आला होता. गणेश पूजन, मेहंदी, सप्तपदी असे सर्व विधी आनंदात पार पडले.

पूजा सांगते की, तिच्या वाढत्या वयामुळे लोक तिला टोमणे मारायचे. म्हणूनच तिने भगवान श्रीकृष्णाशी 

लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती कुमारी आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. लग्नानंतर 

श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवली आहे तर पूजा तिच्या घरीच राहते.

आपल्या खोलीत तिने भगवान श्रीकृष्णाचे छोटेसे मंदिर बांधले आहे. ती जमिनीवर झोपते. सकाळी सात 

वाजता ती मंदिरात पूजा करते. सकाळी आणि संध्याकाळी आरती देखील केली जाते. सोशल मीडियावर 

या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies