मुंबई - बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारलेल तुम्ही पाहिल असेल. परंतु बच्चन यांनी खऱ्या खुऱ्या पोलीस चौकीत यावे लागल्याचा प्रसंग कधीही ऐकलं नसेल.
मग अशात अमिताभ बच्चन यांची महागडी गाडी
कित्येक दिवसांपासून एका पोलीस स्टेशनमध्येच धूळखात पडून आहे. हो हे खरं आहे.
अमिताभ बच्चन यांची १४ कोटींची रोल्स रॉयल्स मुंबईतील एका पोलीस ठाणाच्या आवारात
पडून आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांची रोल्स
रॉयल्स धूळ खात पडून आहे म्हंटल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटेल. परंतु ही गाडी
पोलिसांपर्यंत येण्याची देखील स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. झालं असं,बिग बी यांनी २०१९
मध्ये धन्नाशेठ नावाच्या व्यक्तीला ही गाडी १४ कोटींना विकली होती. मात्र त्या
व्यक्तीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता अमिताभ यांच्याच नावावर ती कार ठेवली.
अशी अडकली कार
मुंबई पोलीस अधिकाऱ्याने एकदा या नवीन
गाडीच्या मालकाकडे गाडीचे कागदपत्र मागितले. कागदपत्रे तपासल्यानंतर गाडी अमिताभ
बच्चन यांच्याच नावे असल्याचे दिसून आले. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी
अधिकाऱ्याने गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणली. कागदपत्रांवर अमिताभ यांचं नाव आणि मालक
कोणी दुसराच यामुळे हे प्रकरण किचकट बनले. तेव्हापासून ही गाडी त्या चौकीतच धूळ
खात पडून असल्याचे समजते.
चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा
यांनी अमिताभ बच्चन यांना ही रोल्स रॉयल्स गिफ्ट दिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये
बिग बी यांनी ती कार एका तिसऱ्या व्यक्तीला विकली. यावेळी कागदपत्रांची सर्व
प्रक्रिया बिग बी यांनी पूर्ण केली होती. मात्र गाडी विकत घेतलेल्या व्यक्तीने कार
आपल्या नावे केली नाही आणि हे प्रकरण किचकट बनले. यामुळेच ही कार अद्याप धूळ खात
पडून असलयाचे समजते.