Type Here to Get Search Results !

आयातीत आमदारांवर भाजपची मदार, काँग्रेसचे दोन आमदार फोडले

 


जुनागड : गुजरातमध्ये मोदी लाट असतानाही जुनागड जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा काँग्रेसने जिंकत पकड घट्ट केली होती.

मात्र, यापैकी दोन आमदारांना भाजपने आपल्या तंबूत खेचत उमेदवारीही दिली. काँग्रेसमधील आयातीत आमदारांच्या भरवशावर भाजप सत्तेचा मार्ग सुकर करू पाहत आहे.

जिल्ह्यात जुनागड शहरासह ग्रामीणमधील विसावदर, मानावदर, मांगरोल व केशोद असे पाच मतदारसंघ येतात. गेल्यावेळी केशोदची एक जागा सोडली तर काँग्रेसने उर्वरित चारही जागा जिंकल्या. भाजपला पकड मिळविणे कठीण होते. त्यामुळे मानावदरचे काँगेस आमदार जवाहर चावडा यांचा २०१९ मध्ये, तर मांगरोलचे काँग्रेस आमदार बाबूभाई वाझा यांचा नुकताच भाजपप्रवेश करून घेण्यात आला. दोन्ही आयातीत आमदारांना भाजपने तिकीट दिले. जुनागडमध्ये काँग्रेसचे आमदार भिखाभाई जोशी पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी ब्राम्हण समाज एकवटला आहे. भाजपने संजय कोरडिया या पाटीदार समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिली असल्याने पाटीदारही एकत्र येत आहेत. पाटीदार मतांवर संपूर्ण गणित अवलंबून आहे.

विसावदरमध्ये पाटीदारांमध्ये कुस्ती
येथे ६५ टक्के मतदार पाटीदार समाजाचे आहेत. गेल्यावेळी काँग्रेसचे हर्षदभाई रिबडिया २२ हजारांनी जिंकले; पण निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले. काँग्रेसने मोठे जमीनदार शेतकरी असलेले करसन वाडदरिया, तर 'आप'ने भूपतभाई भुयानी यांना संधी दिली आहे.

मानावदरमध्ये 'नातीवादी' समीकरण
n
२०१७ मध्ये काँग्रेसकडून जिंकलेले जवाहरभाई चावडा हे भाजपमध्ये गेले व पोटनिवडणुकीत विजयीही झाले. तेच पुन्हा रिंगणात आहेत.
n
काँग्रेसने कडवा पाटीदार समाजाचे अरविंद डानी यांना संधी दिली आहे. 'आप'नेही अहीर समाजाचे करसन भादरका यांना पुढे केले आहे.
n
२०१९ मध्ये भाजपचे चावडा यांच्या विरोधात हरलेले काँग्रेसचे रिनुभाई फलदू हे देखील भाजपमध्ये गेले आहेत. चावडा हे नातीवादी समीकरणात माहीर मानले जातात. या समीकरणामुळे भाजप बाजी मारू शकते.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies