तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे राणादा आणि पाठक बाई ही जोडी महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. या मालिकेतून हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी घराघरात पोहचली.
नुकतीच
नवऱ्या मुलाला म्हणजेच हार्दिकचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याच्या घरी हळदी
समारंभाची धूम पाहायला मिळतेय. सगळे कुटुंबीय मित्रपरिवार त्याच्या या समारंभात
सहभागी झाले आहेत. हार्दिकचा मित्र व अभिनेता अमोल नाईकने हार्दिकच्या हळदी
कार्यक्रमाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.