Type Here to Get Search Results !

मुलीचे नाव केले उघड! बिपाशा बासू-करण सिंगने शेअर केली मुलीची पहिली झलक


 बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनंतर आता बिपाशा बासूही आई झाली आहे. लग्नानंतर 6 वर्षांनीबिपाशा बासू(Bipasha Basu) हिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे.

बिपाशा आणिकरण सिंह ग्रोवर(Karan Singh Grover) यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. नुकतंच बिपाशाने तिच्या सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांनी मुलीची पहिली झलक आणि मुलीचे नाव देखील जाहीर केले आहे.

बिपाशा बासू आणि करण या दोघांनीही इंस्टाग्रामवर गोड बातमी शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना मुलगी झाल्याची माहिती दिली आहे. यात तिने बाळाचा एक फोटोही शेअर केला आहे. बिपाशाने काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाळांच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली तुमच्या प्रेमाचे आणि देवीच्या आशीर्वादाचे प्रत्यक्ष रुप इथे आहे. ते फारच सुंदर आहे. त्याबरोबर तिने तिच्या लेकीचे नावही सांगितले आहे. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या लेकीचे नाव देवी बासू सिंग ग्रोवर असे ठेवले आहे. कारण या पोस्टमध्ये जोडप्याने लिहिले की माता राणी स्वत: त्यांच्या घरी आली आणि म्हणूनच ते त्यांच्या मुलीचे नाव देवी ठेवत आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बिपाशा बासूने तिच्या मुलीची एक झलक केली शेअर
बिपाशा बासूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये मुलीचे पाय आणि जोडप्याचे हात दिसत आहेत. दोघांनी मुलीच्या चरणांना स्पर्श केला आहे. यासोबतच बिपाशाने या सर्वांचे आशीर्वाद मागितले आणि आभार मानले.

प्रेग्नेंसीच्या सुरुवातीला बिपाशाला अनेक समस्यांना जावे लागले सामोरे
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या लग्नाला 6 वर्षांनी आनंदाची बातमी आली आहे. दोघांचे लग्न 30 एप्रिल 2016 रोजी झाले होते. गर्भधारणेदरम्यान, बिपाशाने शेअर केले होते की तिला गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत खूप समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यावेळी ती खूप आजारी होती.

आलिया, नंतर देबिना आणि आता बिपाशा आई झाली
सध्या मनोरंजन विश्वातून एकामागोमाग एक चांगली बातमी येत आहे. अलीकडेच, आलिया भट्ट 

आणि रणबीर कपूर यांना मुलगी झाली आणि अलीकडेच टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत यांनाही मुलगी झाली.(bipasha basu baby photo name blessed with daughter)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies