Sunday, November 13, 2022

जया बच्चन यांंनी सांगितला त्यांच्या काळात येणाऱ्या मासिक पाळीचा अनुभव; म्हणाल्या, 'झाडामागे जाऊन.'


 बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नातनव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda) सध्या चित्रपट जगापासून दूर असली तरी ती खूप प्रसिद्धीच्या झोतात राहते.

नवीन सध्या तिच्या पॉडकास्ट शो व्हॉट द हेल नव्यामुळे चर्चेत आहे. नव्याने अलीकडेच पॉडकास्टमध्ये तिच्या फॅमिलीशी संबंधित काही किस्से शेअर केले आहेत. पॉडकास्टमध्ये, नव्याला तिची आई श्वेता बच्चन आणि तिची आजीजया बच्चन(Jaya Bachchan) यांच्यासोबत पीरियडआणि रिप्रॉडक्टिव्हिटीवर स्पष्ट संभाषण करताना दिसले. यादरम्यान नव्याने तिच्या आजी आणि आईला त्यांच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवावर प्रश्न विचारले.

नव्याने तिच्या पॉडकास्टमध्ये तिची आजी जया बच्चन यांना तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल विचारले. नव्याने जया बच्चन यांना विचारले की तुम्हाला तुमचा पहिला पीरियडचा अनुभव आठवतो का? यावर जया बच्चन यांनी उत्तर दिलं, ‘हो, मला नक्कीच आठवते.त्या म्हणाल्या, "एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला मासिक पाळी आली. चित्रीकरणासाठी जावं लागायचं आणि त्यावेळी व्हॅनिटी व्हॅनची सोय नव्हती. अशावेळी बस किंवा झाडामागे जाऊन पॅड बदलावा लागायचा. अशाप्रकरचे प्रसंग खूप विचित्र होते. यावेळी मासिका पाळीची लाज वाटायची."

No comments:

Post a Comment

Featured Post

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग

एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ...