Type Here to Get Search Results !

तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वाल्हे येथील दोघांवर गुन्हा दाखल

         तरुणास आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी वाल्हे येथील दोघांवर गुन्हा दाखल




   वाल्हे दि.४

तालुक्यातील वाल्हे येथील  कुमार वसंत घोरपडे या 21 वर्षे वयाच्या  तरुणाला  आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल वाल्हे येथील दोघां विरोधात फिर्याद दाखल करण्यात आलीय.. याबाबत जेजुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम. 306 323 34 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे 


या संदर्भात  संगीता वसंत घोरपडे यांनी  दिनांक 2/11/2022 रोजी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा कुमार वसंत घोरपडे याचा मृत देह  दिनांक 26/ 7 /2022 रोजी निरा नदीमध्ये  आढळून आला होता. यानंतर आता तीन महिन्यानंतर मृत कुमार घोरपडे यांची आई   संगीता वसंत घोरपडे यांनी जेजुरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी योगेश वसंत घोरपडे आणि अंकिता योगेश घोरपडे हे कुमार घोरपडे यांची मोटरसायकल त्याच्या नावावर करून देत नव्हते त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले अकरा हजार रुपये परत देत नव्हते त्यांनी त्याला वेळोवेळी मारहाण शिवीगाळ व दमदाटी केली त्याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies