मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ५ जण मृत्युमुखी; दोन जखमी

 


लिबाग: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईच्या दिशेने येत असलेल्या इरटिका कारला एका वाहनाने दिलेल्या धडकेने ही भीषण दुर्घटना घडली आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

उशिरापर्यंत मृत व जखमेची नावे समजू शकलेली नवहती. मिळालेल्या माहितनुसार मुंबईचा दिशेने येत असलेल्या इरटिका मच्छिंद्र आबोरे (वय ३८ रा. पिंपरी चिंचवड) हे चालवित होते. रात्री पावणे बाराच्या मुंबईपासून अलीकडे बोरघाटात ढेकू गावचे हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी वेगात होती की गाडीतील रस्त्यात गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. आतील प्रवासी दरवाजा तुटल्याने बाहेर पडले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही जणांचा तेथेच मृत्यू झाला. महामार्गावरून जात असलेल्या वाहनापैकी एका वाहन चालकाने महामार्ग पोलिसांना हा प्रकार कळविला. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी येवून मदत कार्य सुरू केले. तिघा जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

काल रात्री खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दित पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर एर्टिगा कार क्रमांक MH.14.EC.3501 ही गाडी पाठीमागून कंटेनरला वेगात धडकल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या एकूण नऊ प्रवाशापैकी *पाच प्रवासी मयत झाले असून, ४ जण जखमी आहेत. सदरचा अपघात हा ईरटिगा कार च्या चालकाने वाहन वेगात व हयगयीने चालवल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..