Tuesday, November 29, 2022

गोरेगावमधील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग, जीवितहानी नाही

 


मुंबईतील गोरेगावच्या दिंडोशीमध्ये आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? याचा तपास दिंडोशी पोलिस करत आहेत.

आगीत झाडं जळून खाक

जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडो झाडं जळून खाक झाल्याची शक्यता आहे. ही आग इतकी भीषण होती की, लांबूनही स्पष्टपणे दिसत होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. दरम्यान, ज्या जंगल परिसरात आग लागली आहे, तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग असल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात बिबट्या, मोर, वानर, हरण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. तसेच या परिसरात अनेक वनस्पती देखील आहेत. पण या आगीच्या घटनेमुळे या वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...