Friday, July 1, 2022

बापदेव घाटात पुरंदर मधील जोडप्याला लुबाडले

 बापदेव घाटात पुरंदर मधील जोडप्याला लुबाडले

 सासवड दि.१



बोपदेव घाटात  रात्रीअपरात्री जाणार्‍या येणार्‍यांना लुबाडले जात असल्याने तेथे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली


असे असतानाही घाटातून जाताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोघांना चोरट्यांनी तलवारीने वार करुन जखमी करुन एका दाम्पत्याला लुबाडल्याचे  समोर आले आहे.


याप्रकरणी बाळु बबन जाधव (वय ४२),सध्या रा. गुजरवाडी, कात्रज यांनी कोंढवा पोलीसात  फिर्याद दिली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळु जाधव हे पुरंदर तालुक्यातील वाघापूर

या मुळ गावी जाण्यासाठी मोटारसायकलवरून पत्नीसह बोपदेव घाटातून बुधवारी रात्री साडेदहा वाजता जात होते.

वाटेत ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

तेव्हा बाळु यांनी त्याला प्रतिकार केल्यावर त्यांनी बाळु यांच्या डोक्यात तलवारीने वार करुन जखमी केले.

त्यांच्याकडील मोबाईल आणि पत्नीच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन नेले.

सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे  अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...