जेजुरी वॉरियर्सने जिंकला भैयासाहेब चषक

 जेजुरी  वॉरियर्सने जिंकला भैयासाहेब चषक

     


 वाल्हे दि.७

      पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे संपन्न झालेल्या भैयासाहेब खाटपे चषक २०२२ या स्पर्धे मध्ये जेजुरी वॉरियर्स या संघाने अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून भैयासाहेब खाटपे चषक २०२२ हा जिंकला आहे .विजयी संघाला भैयासाहेब खाटपे खाटपे यांच्या हस्ते ७१ हजाराचे पारितोषिक व चषक देण्यात आला तर दुसरे बक्षीस नीरा येथील नीरा लायन्स क्रिकेट क्लब मिळवले आले.  पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी  अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या हस्ते ५१ हजार व ट्रॉफी या संघाला देण्यात आली.



      वाल्हे यथील संत ज्ञानेश्वर महाराज  पालखी मैदानावर पाडव्याच्या मुहूर्तावर या क्रिकेट सोर्धेचा शुभारंभ भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या  हस्ते करण्यात आला होता. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेची  काल  दिनांक ६ एप्रिल  रोजी सांगता झाली.काल झालेल्या अंतिम सामन्यात जेजुरी वॉरियर्स विरुद्ध  नीरा लायन्स क्रिकेट क्लब यांच्यात  चुरशीचा खेळ पाहायला मिळाला.अखेरच्या चेंडूवर सिक्स मारत  जेजुरी वॉरियर्सने  विजय मिळवला. निरेचा संघ उपविजेता ठरला, तृतीय क्रमांक सासवड क्रिकेट क्लब तर चतुर्थ क्रमांक वाल्हे क्रिकेट क्लब यांना मिळाला .या वेळी झालेल्या अंतिम सामन्यासाठी  प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व तालुका पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष राहुल शिंदे,पत्रकार स्वप्नील कांबळे, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, आण्णा भाऊ साठे विकास प्रतिष्ठानचे आध्यक्ष सुनील पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते संदिप निगडे, सुनिल नवले, अजित जैन, इत्यादीसह अनेक क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.या सामान्यांचे  आयोजन भूषण रेड्डी, अकबर सय्यद तसेच नीरा लायन्स क्रिकेट क्लब यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?