सासवड येथे महिलेला विनयभंग व वारंवार लैंगिक संबंधाची मागणी केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 सासवड येथे महिलेला विनयभंग व वारंवार लैंगिक संबंधाची मागणी केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 


सासवड प्रतिनिधी दि.१८


   तालुक्यातील सासवड येथील  एका महिलेला वारंवार लैंगिक संबंधाची मागणी करून त्रास दिल्याबद्दल, त्याचबरोबर या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. याबाबत  सासवड पोलिसांनी यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम.  ४५२,३६४,३५४(ड ) ५०४,५०६  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .

      याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यासंदर्भात सासवड येथील एका पस्तीस वर्षीय महिलेने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीचा मित्र असलेला प्रकाश ज्ञानोबा गिरमे रा.गिरमेआळी जुने भैरोबा मंदिराजवळ सासवड ता.पुरंदर जि.पुणे  हा तिच्या पतीच्या मृत्यू नंतर तिला त्रास देत होता. तो तिला अनेक वेळा  शारीरिक सुखाची मागणी करीत होता.फोन करून याबाबत तिला त्रास देत होता. दिनांक १८ एप्रिल रोजी ती एकटीच घरी असताना तो  तिच्या घरी  गेला  व तिच्या अंगाशी झटू लागला. यानंतर फिर्यादी ने आरडा ओरडा केल्याने तो पळून गेला.याबाबतची फिर्याद सासवड पोलिसात देण्यात आली आहे.याबाबाचा अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.