तालुक्यात सासवड जेजुरी येथे प्रचंड वाहतूक कोंडी १० किलोमिटर पर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा

तालुक्यात  सासवड जेजुरी येथे प्रचंड वाहतूक कोंडी १० किलोमिटर पर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा 



सासवड प्रतिनिधी दि.१७

  पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.किमान दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

   पुरंदर तालुक्यातील पालखी महामार्गावर आज दिनांक १७ रोजी दुपार पासून सासावड आणि जेजुरी या मोठ्या शहरांमधून मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळ पासूनच या रस्त्यावर मोठी वाहातून होत होती. दुपारी जेजुरी येथे वाहतूक कोंडी सुरू झाली.त्यानंतर सासवड येथे सुद्धा वाहतूक कोंडी झाली. रात्री आठ वाजता ही कोंडी दोन्ही शहरात आणखीनच वाढली.किमान दहा किलोमीटरवर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या  होत्या.त्यामूळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सलग तीन दिवस  असलेली सुट्टी त्याच बरोबर जेजुरी, नारायणपुर अशा ठिकाणी देवदर्शनास  आलेल्या भाविकांमुळे त्याच बरोबर  गावोगावच्या यात्रा मुळे मोठी गर्दी झाली होती. आणि यातूनच आज पुरंदर तालुक्यात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे...

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..