Friday, April 15, 2022

नीरा येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

 नीरा येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

  




नीरा दि.१६


    पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नीरा आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी आणि नीरा नदी काठावर असलेल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.


     नीरा नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते . आज पहाटे विजय जाधव यांच्या हस्ते मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला.तर सकाळी दर्शनास येणाऱ्या भाविकांना लाडूचा प्रसाद देण्यात आला. विजय जाधव, संपत जाधव व हरीभाऊ कुदळे यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले.



No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...