सासवड येथे पूर्ववैमनस्यातून चहा विक्रेत्याला मारहाण
सासवड दि.१७
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका चहा विक्रेत्याला अगोदरच्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण करण्यात आली आहे. पाच ते सहा लोकांनीही मारहाण केल्याची तक्रार सासवड पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान 143,147,148,149,324,395,504,506
नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यासंदर्भात सासवड येथे चहा विक्रीचा व्यवसाय करणारे कौस्तुबकुमार विलास जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ६/०३/२०२२ रोजी १२ वाजलेच्या सुमारास सासवड गावचे हददीत लांडगे आळी येथे, सुभागडे यांचे स्टीनमेकर दुकानाचे समोर, फिर्यादी हे ओम कलेक्षन या कपडयाचे दुकानातील चहाची ऑर्डर देवुन येत असताना दि.१५/0३/२०२२ रोजी झालेल्या भांडनाचे कारनावरून शुभम पांडे व कैलास भिंताडे दोघे रा.भिवडी ता.पुरंदर जि.पुणे व त्यांचे सोबत इतर ५ ते ५ अनोळखी इसम यांनी त्यांना लाकडी दांडके, उसाचे कांडके यांच्या साह्याने त्यांच्या पाठीत,पायावर, बरगडीवर मारहान केली. शुभम पांडे याने त्यांच्या हातातील चहाचे थर्मास घेवुन त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या झटापटीमध्ये शुभम पांडे याने त्यांचे खिशातुन जबरदस्तीने 3000/-रुपये काढुन घेतले. व तुला दाखवतो अशी धमकी देवुन दोन मोटार सायकल व एक चारचाकी गाडी मध्ये बसुन निघुन गेले. अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली असून याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोणकर करीत आहेत.