Wednesday, March 16, 2022

बीएसएनएलच्या तांब्याच्या तारा चोरणारांना पोलिसांनी केले जेरबंद

 बीएसएनएलच्या तांब्याच्या तारा चोरणारांना पोलिसांनी केले जेरबंद

 


 सासवड दि.१६



    पुरंदर तालुक्यातील सासवड येथे बीएसएन एलच्या तांब्याच्या तारा चोरी करणारांना सासवड पोलिसांनी जेरबंद केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भा.द.वि.कलम379,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात. आला आहे.


    याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली म हीइती अशी की, यांदरभात प्रकाश बबन गिरमे यानी सासवड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी 1)प्रकाश रमेश चव्हाण वय 27 वर्ष सध्या रा. हनुमान नगर, जेजुरी मुळ रा.बंकलगी तांडा पो.आहेरवाडी ता.दक्षिण सोलापुर 2)सुनिल रतन राठोड वय 27 वर्ष सध्या रा.हनुमान नगर, जेजुरी मुळ रा.इंडीतांडा ता.इंडी जि.विजापुर 3)संजय सोमनाथ चव्हाण वय 34 वर्ष सध्या रा.हनुमान नगर, जेजुरी मुळ रा.बंकलगी तांडा पो.आहेरवाडी ता.दक्षिण सोलापुर हे सासवड येथे दिनांक .15/03/2022 रोजी रात्री 09:00 ते 10:00वा.चे सुमारास सासवड येथील जिजामाता उद्याना समोर. केबल उकरात असताना आढळून आले यामध्ये त्यांनी.25 हजार रुपये किमतीच्या बी एस एन एल च्या पुरलेल्या तरा चोरी केल्याचे आढळून आले या साठी त्यांनी एका छोटा हत्ती नं.MH12 SF2338 चां देखील वापर केला आहे.आरोपी आणि टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सय्यद करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Featured Post

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप

  नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले  रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप  नीरा : प्रतिनिधी       ...