बेकायदा सावकारी प्रकरणी सासवड पोलिसात तक्रार दाखल.
सासवड दि.५
पुरंदर तालुक्यातील वीर येथील एका शेतकऱ्याला व्याजाने पैसे देऊन त्या पोटी त्याच्या शेत जमिनीची परस्पर विक्री केल्या प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद दाखल.करण्यात आली आहे.या बाबत सासवड पोलिसांनी भा.द.वि.कलम420,504,506,34, महाराष्ट्र.सावकारी अधिनियम कलम 39 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत सासावड पोलीसानी दिलेली माहिती अशी की, या संदर्भातली फिर्याद वीर ता.पुरंदर येथे राहणारे 38 वर्षीय शेतकरी अभिजीत विश्वासराव धुमाळ यांनी सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी 1)नागेश किसन परमाळे,रा.देवाची ऊरुळी ,ता.हवेली,जि.पुणे ,2)रविंद्र तुकाराम खंडागळे,रा.सातववाडी,हडपसर,ता.हवेली ,जि.पुणे ,3)किरण अर्जुन भोर रा.सातववाडी,हडपसर, ता.हवेली ,जि.पुणे यांनी फिर्यादी यांना सन 2017 ते 2020 या कालावधीत व्याजाने दिलेल्या पैशांची वसूली करण्याकरीता मानसिक त्रास दिला, शिवीगाळ दमदाटी केली. त्यांच्या मालकीचे गट नंबर. 687,695,704,711 जी व्याजापोटी तारण ठवली असताना परस्पर दुस-याला विकून टाकून माझी फसवणूक केली या बाबतची फिर्याद दिली आहे.या संदर्भातली अधिकचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक लोणकर करीत आहेत.