पुरंदर विमानतळाचा प्रश्न समन्वयाने सुटावा; काँग्रेसचे मोहन जोशी यांची भूमिका

 पुरंदर विमानतळाचा प्रश्न समन्वयाने सुटावा; काँग्रेसचे मोहन जोशी यांची भूमिका

    

     आंतराराष्ट्रीय विमानतळासाठी ‘पुरंदरच्या’ जागेला संरक्षण विभागाचा नकार? ‘त्या’ आमदारांचा नव्या जागेचा प्रस्ताव



        पुणे ( प्रतिनिधी ) – पुणे जिल्हा आणि शहरातील उद्योग, व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मोठी गरज आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून पुरंदर विमानातळाचा प्रस्ताव मार्गी लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले आहे.


गेल्या काही वर्षात पुणे शहर वेगाने विस्तारते आहे. पुणे आणि परिसरात औद्योगिक क्षेत्रातील मोठे, मध्यम आणि लघु उद्योगांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोनशे कंपन्या असून हा उद्योगही वाढत आहे. या अनुषंगाने व्यापारसुध्दा वाढत चालला आहे. अशा वेळी पुण्याची अन्य शहरे, राज्ये, परदेशातील २५ महत्वाची शहरे यांच्याशी कनेक्टीव्हीटी वाढणे जरुरीचे आहे.याकरिता पुण्यालगत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे.



गेली काही वर्ष खेड, पुरंदर अशा जागांच्या निश्चितीत गेली, आता विमानतळ प्रस्ताव बारगळल्यात जमा होणे पुण्यासाठी परवडणारे नाही. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून लवकरात लवकर सर्वमान्यतोडगा काढावा आणि विमानतळाचे काम सुरू करावे, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे. याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?