Saturday, January 8, 2022

निरा कन्या शाळेत १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण

 निरा कन्या शाळेत १५ ते १८ वयोगटाचे  लसीकरण 



दि.८

            कोव्हिडं 19 या रोगाने गेले दोन वर्षे थैमान घातले आहे .मास्कचा वापर ,हाताचे निर्जंतुकीकरण आणि सुरक्षित अंतर या मार्गाने कोरोनापासून काळजी घेतली जाते ,तरीही लसीकरण हा कोरोना संरक्षणाचा प्रभावी उपाय आहे .शासनाच्या नवीन धोरणानुसार दिनांक ३ जानेवारी पासून १५ ते१८ वयोगटातील किशोर वयीन मुलांना लसीकरणास सुरुवात झाली आहे .सौ .लिलावती रिखवलाल  शहा कन्या शाळेमध्ये आज या लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज विद्यालयात झालेल्या लशिकरणा मध्ये १९५ मुलींनी लस घेऊन लीसिकरणास चांगला प्रतिसाद दिला 

    आज दिनांक ८जानेवारी रोजी निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत नीरा येथील सौ.लीलावती रिखावलाल  शहा कन्या शाळेतील  इयत्ता ९ वि व १० वीच्या एकूण १९५ मुलींचे सुरक्षित पद्धतीने लसीकरण करण्यात आले .या वेळी लस घेणे किती गरजेचे आहे व कोरोनापासून वाचण्याचे उपाय  याचे मार्गदर्शन  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नरेश बागुल  यांनी मुलींना केले .


      या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक बाळासाहेब भंडलकर,आरोग्य सहायिका बेबी तांबे ,शुभांगी रोकडे , स्तवशीला बंडगर,सुशांत सोनवणे,सत्यभामा म्हेत्रे ,चेतन धायगुडे  यांनी सुरक्षित व तणावमुक्त वातावरणात लसीकरण केले .या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता पासलकर,पर्यवेक्षक उत्तम लोकरे,संजय भोसले,रुपाली रणनवरे ,राजश्री चव्हाण ,संदीप शिंदे ,अमर  नांदखिले ,कुणाल खैरकार  व  सर्व सेवक वर्ग उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...