राज्यात
निर्बंध लागू: नाईट कर्फ्यू सह कडक निर्बंध , सरकारकडून नवी
नियमावली जारी
पुणे दि.८
राज्यात
वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात
आली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य
सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट
कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. हे नवे नियम रविवार (9 जानेवारी) मध्यरात्री बारा वाजेपासून लागू होतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके
काय-काय?
उद्या मध्य रात्रीपासून राज्यात
कडक निर्बंध
रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सर्वत्र
संचारबंदी. नाईट कर्फ्यू घोषित.
राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय.
दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
रात्री फक्त अत्यावश्यक
सेवा सुरु राहणार.
नाट्यगृह, सिनेमागृहांना आसन क्षमतेनुसार फक्त 50 टक्के ग्राहकांसाठी परवानगी
राज्यातील हॉटेल आणि
रेस्टॉरंट रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद. दिवसा 50 टक्के क्षमतेने सुरु
राहणार.
बाहेरील राज्यातून
महाराष्ट्रात येणाऱ्यांना 72 तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक राहील.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत
असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त
संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित
असेल.
अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी
केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसारच नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील. देशांतर्गत
प्रवासासाठी दोन्ही लसींचे डोस लागतील. आंतरराज्यीय प्रवासासाठी प्रवासाच्या 72 तासांआधी आरटीपीआर टेस्ट झालेली असावी. त्याचा रिपोर्ट कोरोना
निगेटिव्ह असावा.
सार्वजनिक वाहतूक
व्यवस्थेचा वापर हा फक्त दोन्ही डोस झालेल्यांसाठी करता येईल.
स्पर्धा परीक्षा या भारत
सरकारच्या नियमावलीनुसार घेतल्या जातील.
सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थिती असेल. पण कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले
असावेत. एकही डोस बाकी असल्यास त्यांना कार्यालयात उपस्थित राहता येणार नाही.
राज्यात काय सुरु-काय असणार बंद?
1) राज्यातील शाळा, कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
राहतील. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या कोचिंग क्लासेससाठी सूट देण्यात आली
आहे. इतर सर्व कोचिंग क्लासेस 15
फेब्रुवारीपर्यंत बंद
असतील. हे क्लासेस ऑनलाईन सुरु असतील.
2) सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे.
3) राज्यात दिवसा जमावबंदी
असेल तर रात्री संचारबंदी असेल. पण अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली आहे.
4) मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे.
5) सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
6) राज्यातील थिएटर फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील
7) हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री दहा
वाजेपर्यंतच सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
8) स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णत: बंद राहतील.
9) विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
10) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत
असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त
संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित
असेल.
11) अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल
12) मुंबई लोकल वाहतुकीवर
कोणतेही निर्बंध नाहीत.
12) दोन डोस घेतलेल्या ग्राहक
आणि पर्यटकांनाच शॉपिंग मॉलमध्ये परवानगी मिळेल. यासाठी ग्राहकांना थर्मल
टेस्टिंगला सामोरं जावं लागेल.