Type Here to Get Search Results !

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्या जागेला संरक्षण विभागाचा नकार

 पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ 

नव्या जागेला संरक्षण विभागाचा नकार 



पुरंदर : दि.५

       पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुचवण्यात आलेल्या नवीन गावांचा प्रस्ताव संरक्षण विभागाने फेटाळला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.


    पुरंदर तालुक्यातील राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, रोमणवाडी, मावडी, पिंपरी ही गावे जिरायती असून या गावांमध्ये विमानतळ उभारावे असा प्रस्ताव आमदार संजय जगताप यांनी दिला होता. राष्ट्रवादीने त्यात बारामतीची आणखी तीन गावे घुसडून विमानतळ आपल्या तालुक्यात ओढले होते. पण संरक्षण विभागाने या सर्व राजकीय कसरतींना उडवून लावत नवीन जागा योग्य नसल्याचे सांगत हा प्रस्ताव धुडकावून लावला. 



     दरम्यान राज्य सरकारने यापुढील भूमिका स्पष्ट करावी. पुणेकरांचे नव्या विमानतळाचे स्वप्न आणखी दशकभर लांबणार की काय अशी भीतीही श्री. मेहता यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies