Tuesday, December 27, 2022

शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जयकुमार गोरे यांची भेट; तीन दिवसांपूर्वी झाला होता अपघात

 


पुणे - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पवारांनी गोरे यांच्या तब्येतीबाबत विचारपूस देखील केली. राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशनामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे.

अशात पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन शरद पवार यांनी गोरे यांची भेट घेतल्यामुळे एका वेगळ्या राजकारणाचे दर्शन यावेळी सर्वांना पाहायला मिळाले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला होता. अपघातामध्ये ते चांगेलच जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, बाँडीगार्ड आणि चालक असे चौघेजण जखमी झाले होते. अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी देखील गोरे यांची भेट घेत तब्येतीबाबतची माहिती जाणून घेतली.

कसा झाला होता अपघात
आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण-लोणंद रस्त्यावर फलटण शहरानजिकच्या स्मशानभूमीजवळ बाणगंगा नदीवरील पुलावरून गाडी ५० फूट खाली कोसळून हा अपघात झाला होता. तीन दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे लोणंदकडून फलटणच्या दिशेने येत असताना चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने वेगात असणारी गाडी पुलावरून खाली कोसळली अपघात झाला होता.

No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...