जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी एक मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर अडविले.
जळगाव
जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या एका गावात दि.४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते
दि.५ डिसेंबरच्या पहाटे ५ पर्यंत एक निंदनीय आणि संतापजनक प्रकार घडला आहे. एक २५
वर्षीय मूक बधीर तरुणी रस्त्याने जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला
अडविले. दोघांनी तिला ओढाताण करीत डोळ्यावर मारहाण केली. तर एकाने तिच्यावर
अत्याचार केला.
घटनेची
माहिती समोर आल्यावर पीडितेला उपचारार्थ धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने तिने सर्व प्रकार सांगितला. तसेच
आरोपी समोर आल्यास त्यांना ओळखेल असे तिने सांगितले आहे. याप्रकरणी मेहुणबारे
पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग
देशमुख करीत आहेत.