Tuesday, November 15, 2022

विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या महिलेच्या त्रासाला वैतागून प्रियकराची आत्महत्या, वाकड परिसरातील घटना


 पिंपरी :  Pune Pimpri Crime | विवाहबाह्य संबंध  ठेवलेल्या महिलेच्या त्रासाला वैतागून प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे.

दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचं नाही. तू माझ्या सोबत येऊन रहा अन्यथा पोलिसांकडे तक्रार करेन अशी धमकी विवाहित महिलेने प्रियकर विकास विलास माळवे (वय-27) याला दिली. महिलेच्या जाचाला कंटाळून विकास याने शनिवारी (दि.12) सकाळी 8.30 च्या सुमारास एका शेतात नायलॉन दोरीने गळफास  घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी  लिहून ठेवली असून महिला जाच करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

याप्रकरणी विकास माळवे याच्या 50 वर्षाच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 33 वर्षाच्या विवाहित महिलेवर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विकास आणि 33 वर्षीय आरोपी महिला यांच्यामध्ये मागील एक वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते.
महिलेचा पती मुंबईत असून तो पत्नीसोबत राहत नाही. महिलेला दोन मुली आहेत.
मयत विकास हा छोटा व्यवसाय करुन त्याचे घर चालवत होता. तर आरोपी महिला ही त्याच्याकडे तिचा संसार चालवण्यासाठी पैशांची मागणी करत होती.
आरोपी महिला मागील एक वर्षापासून विकासकडे लग्न करण्याची मागणी करत होती.
तसेच इतर कोणासोबत लग्न केले तर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होती.
महिलेच्या जाचाला वैतागून विकास याने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभय दाभाडे करीत आहेत.

 

No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...