पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही
दिवसांपासून नाराजी नाट्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत.
गुजरात
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक यादी जाहीर
करण्यात आलीय.पण या स्टार प्रचारकांच्या यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव गायब
झालंय. त्यामुळे कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराज असल्याच्या चर्चांना
पुन्हा एकदा उधाण आलंय.
राष्ट्रवादी
काँग्रेसचं काही दिवसांपूर्वी शिर्डीत चिंतन शिबिर पार पडलं होतं. या शिबिरात
पक्षाध्यक्ष शरद पवार हे आजारी असून हाताला बँडेज बांधून पोहोचले होते. पण या
कार्यक्रमाला अमोल कोल्हे उपस्थित नव्हते. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षात नाराज असल्याची बातमी समोर आली होती.
दुसरीकडे
अमोल कोल्हेंनी प्रकृती बरी नसल्याने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो.
याबाबत आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली होती.
अमोल कोल्हेंची अमित शाहा यांना भेट
अमोल
कोल्हे यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप
गरुड झेप’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या
प्रमोशनासाठी भेट घेतल्याचं स्वत: स्पष्ट केलं होतं.
अमोल कोल्हेंची देवेंद्र फडणवीस यांना भेट
याशिवाय अमोल
कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प या संदर्भात
चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.