नीरा वाल्हे दरम्यानचे रेल्वे गेट उद्या पासून दोन दिवस राहणार बंद

 नीरा वाल्हे दरम्यानचे रेल्वे गेट उद्या पासून दोन दिवस राहणार बंद



   नीरा दि.७


      पुणे – मिरज रेल्वे मार्गावरील वाल्हे – नीरा रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी ७९/०-१ येथील रेल्वे फाटक क्रमांक २७ आवश्यक तांत्रिक उद्या पासून दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले  आहे.


      नीरा नजीक थोपटेवाडी येथे असलेले  पुणे पंढरपूर मार्गावरील रेल्वे फाटक तांत्रिक कामामुळे  शुक्रवार दिनांक ८ जुलै रोजी  सकाळी ८ ते रविवार दिनांक १० जुलै सकाळी ८ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

       त्यामूळे या कालावधी मध्ये  वरील या मार्गावरील वाहतूक  नीरा – मोरगांव- जेजुरी या   रस्त्याने वळवली असून वाहन चालकांनी गैर सोय टाळण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा असे रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले आहे.त्यामूळे नीरा - वाल्हे - जेजुरी या मार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद असणार आहे. 


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?