जेऊर येथे ऊस वाहतूक ट्रक मोटरसायकलवर झाला पलटी. एक जण ठार तर एक गंभीर जखमी
नीरा दि.५
पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील जेऊर फटका नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक उसासह मोटरसायकलवर पलटी झाला. यामध्ये एका मोटारसायकल स्वर जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आज दिनांक ५ एप्रिल जेऊर येथून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 04 पी 7496 हा आज सकाळी साडेअकरा वाजले च्या दरम्यान जेऊर रेल्वे फटका नजीक आला असता ट्रकचे पाठीमागे उजव्या बाजूचे चाक तुटून बाहेर आले.ट्रक शेजारून जाणारी दुचाकीला चाक धडकले त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली त्याचबरोबर चाक तुटल्याने ऊसाने भरलेला ट्रक सुद्धा या दुचाकी वर पलटी झाला आणि दुचाकीवरील दोघेही उसाच्या खाली आले. यामध्ये शिवाजी शिंदे वय 54 यांचा जागीच मृत्यू झाला तर रावसाहेब शिंदे वय 55 हे जखमी झाले आहेत घटनेनंतर स्थानिक तरुण व पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडी ऊसाखाली अडकलेल्या दोघांनाही बाहेर काढले व यातील जखमीला रावसाहेब शिंदे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे